Monday, August 16, 2010

निराशा : आदित्य_देवधर

आटला आहे किनारा आटली मोकाट
आशा मृगजळाच्या संगतीने
राहतो आहे अताशा बोचल्या
कित्येक राती टोचली कित्येक
नाती पाहुनी खपली कुठेशी
हासती जखमा जराशा सोहळेही काय
होते साजरे जे काय झाले भाकरी
कोंडा गिळूनी वाजला फुटकाच
ताशा खोल अंधारी तळाशी एकदा मज
हाक आली नाव मी पुसता तिला
हसुनी म्हणाली 'मी निराशा' दोर
बांधूनी गळी मी नाचलो सांगेल
तैसा ओळखीचे चेहरे होते तिथे
बघण्या तमाशा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2293

No comments:

Post a Comment