जाळे पुढयात माझ्या पसरून कोण
गेली, जाळ्यामधील मासा विसरून
कोण गेली ! एका स्मितातुनीही
घायाळ मज समजता- उपचार पूर्ण
करण्या विसरून कोण गेली !
काहूर स्पंदनांचे ह्रदयात
माजवूनी, हृदयासनात बसण्या
विसरून कोण गेली ! नयनात
भाव-सुमने हलकेपणी उमलता-
टिपण्यास या मधुकणां विसरून
कोण गेली ! घेऊन मीलनाच्या
चंद्रासमोर शपथा, बाहूत मज
बिलगण्या विसरून कोण गेली ?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Tuesday, August 24, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment