Saturday, August 14, 2010

ही माणसे घनदाट देवासारखी : निलेश कालुवाला

मज भेटलीत अफाट देवासारखी ही
माणसे घनदाट देवासारखी तू
वाटले येशील देवासारखा मी
पाहिली मग वाट देवासारखी आला
कधी ,गेला कधी ,कळले न मग केलीस
तू ,वहिवाट देवासारखी
बोलावयास पर्याय मग होता कुठे?
तू मारली जर काट देवासारखी जी
काल वेड्यासारखी अन वागली ती
आज बिनबोभाट देवासारखी
सार्‍याच वाटा बंद झाल्यावर
इथे ही सापडे मग वाट देवासारखी
निलेश कालुवाला
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2289

No comments:

Post a Comment