सुखाच्या सर्व व्याख्यांना
जरा बदलून पाहू या.. चला,
केव्हांतरी आयुष्यही जवळून
पाहू या!! दिव्या, पंख्याविना
वातानुकूलीत हे असे जगणे.. चला
अंधार पाहू या, जरा निथळून
पाहू या!! किती उपकार मानावे,
अता ह्या भार नियमांचे? अता
ह्या शासनालाही जरा 'खवळून'
पाहू या!! समुद्राच्या जणू
लाटा, तसे हे मानवी जत्थे.. चला
प्रस्थापितांचे जग जरा उलथून
पाहू या!! दिव्याची वात ही साधी,
तिला सांगून मी दमलो!
म्हणे!..ह्या वादळालाही जरा
बिलगून पाहू या!! -- बहर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Wednesday, August 11, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment