Wednesday, August 4, 2010

पापणी अद्याप माझी... : केदार पाटणकर

पापणी अद्याप माझी मिटत नाही
जीवनाचा मोह काही सुटत नाही
श्रावणातच पाहुनी घ्यावे
धरेला एरवी इतकी कधी ती नटत
नाही बोलणे माझे जगाला कळत
नाही सांगणे मजला जगाचे पटत
नाही सर्व देणी फेडता येतात
येथे कर्ज मायेचे कधीही फिटत
नाही लांब, मोठा दिवस हा जातो
कसाही आणि छोटी रात्र कटता कटत
नाही
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment