Thursday, August 12, 2010

सूर्य माझ्या मागुनी येणार होता : कैलास गांधी

जाहलेला जो कपाळी वार होता तोच
माझा मानलेला यार होता घोषणा
जो मागच्या विसरुन गेला तो नवी
आश्वासने देणार होता हार माझी
हीच त्याची जीत व्हावी आज तो
माझ्यापुढे जाणार होता धूळ
उडते चेहऱ्याच्या वाळवंटी
अश्रू माझा पापण्यांवर स्वार
होता दूषणांचे श्लोक त्याने
वाचलेले आजला तो आरत्या गाणार
होता आज ही खटला पुन्हा
रेंगाळला कालचा जो फैसला
होणार होता घेतले चंद्रास मग
मी सोबतीला सूर्य माझ्या
मागुनी येणार होता सोडली तू
साथ माझी ठीक झाले काय हा वेडा
कवी देणार होता
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment