Saturday, August 21, 2010

व्हावास तू सोसाट वार्‍यासारखा : निलेश कालुवाला

व्हावास तू सोसाट
वार्‍यासारखा जावास तू चमकून
तार्‍यासारखा जाणून घे
तुझ्यातली ताकत अता आहेस तूच
बुलंद नार्‍यासारखा विझली
अता जी आग होती पेटली न धगधगला
कोणी निखार्‍यासारखा तू
खेळली लाटेप्रमाणे जीवनी आहे
उभा मी हा किनार्‍यासारखा
होते शब्द बस सोबतीला एवढे मी
उमटलो पानी उतार्‍यासारखा तू
भाव माझा जाणला तेव्हा कुठे?
मी वाजलो जेव्हा
नगार्‍यासारखा तू तापता
उतरेन मी खाली कसा? मज लाभला
स्वभाव पार्‍यासारखा नव्हती
फिकीर कधी कशाची वाटली मी
खेळलो जीवन जुगार्‍यासारखा
निलेश कालुवाला.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment