Saturday, August 7, 2010

ठेवणीतल्या आठवणींना.... : प्रदीप कुलकर्णी

.............................................................
*ठेवणीतल्या आठवणींना....*
.............................................................
गतकाळाच्या कपाटातले जुनेर
जगणे दमट, दमट ! ठेवणीतल्या
आठवणींना आता येतो वास कुबट !
अश्रूसुद्धा पूर्वीइतके
राहिलेत हे तरल कुठे ?
कधीकाळच्या दुःखाचाही झाला
आहे रंग फिकट ! त्यांच्या
सलगीवरी एवढे उगाच मरणा जळू
नये... या श्वासांचे देहासंगे
जन्मभरी असणार लगट ! कधीपासुनी
एका ओळीवरीच रेंगाळली कथा...
पहाटवाऱया, ये, ये लवकर, हे
रात्रीचे पान उलट ! कसलेला
असशील एक तर किंवा अगदी
कच्चाही... किती निरागस भासतोस
तू दाखवताना तुझे कपट ! भेटतेस
तू रोज परंतू, भेटतेस तू रोज
कुठे ? एकदाच ये कधीतरी मज
भेटाया तू तुझ्यासकट ! नाव
तुझे मी घेत ईश्वरा घुमत
राहिलो सतत जरी... काय मला देईल
देउनी आकाशाचा रिता घुमट ? *-
प्रदीप कुलकर्णी *
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment