Tuesday, August 10, 2010

तिथे ये पहाटे... : ह बा

असा पाट ओला अशी कंच राने असे
चिंब डोळे तुझ्या आठवाने तिथे
ये पहाटे... तिथे... त्या तिथे ये
जिथे पाहिलेले निखारे दवाने
उभे झाड आहे तरी जीव नाही दिले
घाव त्याला कुणा पाखराने? नको
ऐकवू तू तुझा काळ आता तिला
जाळणारे असूरी जमाने किती खोल
व्हावे मनाच्या तळाने? कितीदा
बुडावे... रडावे हबाने? -हबा
शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2283

No comments:

Post a Comment