Saturday, August 14, 2010

जीवना माझ्या बरोबर चालतांना : स्नेहदर्शन

जीवना माझ्या बरोबर चालतांना
हार नाही मानली मी हारतांना
कोणत्या वस्तीत मी आलो उगाचच
चेहरा माझा विसरलो,पाहतांना
जाळतो इतिहास माझा रोज हल्ली
रोज का दिसते मला ती हासतांना
सांग ना विश्वास म्हणजे काय
असते? का नदी बघते मुलांना
वाहतांना ? वेदनेशी भेट होती
नेहमीची पाहिले बस हास्य माझे
चाळतांना
----------------------------स्नेहदर्शन
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment