पेटवणार मनातले धुमसते
वैफ़ल्य केव्हातरी आयुष्यात
रचेन एक कविता जाज्वल्य
केव्हातरी एकच तास कुठे समोर
असतो दिवसात तू आणि मी याहीहून
प्रदीर्घ काळ टिकवू हे शल्य
केव्हातरी घडवा रोज प्रसंग जे
शिकवती श्वासास थांबायला
आवश्यक इतकेच फ़क्त असते
कौशल्य केव्हातरी पोटार्थी
भरतात पोट गणिका निर्वस्त्र
झाल्यावरी कामार्थी उठतात
घेत अपुले शैथिल्य केव्हातरी
टाळ्या देत खुशामतीत गढलो
इतक्याचसाठी तुझ्या
अस्तित्वास तुझ्या निदान
समजो साफ़ल्य केव्हातरी
जन्मांचा उपभोग घेत बसणे ही
धोरणे आमची कंटाळून म्हणेल
देव 'चल घे कैवल्य' ... केव्हातरी
नक्की मी नसणार पूर्ण परका....
बदनाम झालो तरी नजरेतून उगाच
का बरसते..... वात्सल्य
केव्हातरी सर्वांगीण विचार
काय करता..... प्रत्येक बाबीवरी
झटझट निर्णय घेत घेत जमते....
साकल्य केव्हातरी आताशा
विरले, बरेच विटले...... वापर किती
जाहला नात्यावर अपुल्या
सुखात विलसे.... मांगल्य
केव्हातरी तू देहासच
'बेफ़िकीर' अपुल्या सर्वस्व
मानू नको मन म्हणुनी असते,
मनात उरते दौर्बल्य
केव्हातरी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1976
Monday, March 15, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment