Friday, March 19, 2010

पिले खेकड्यांची : अनिल रत्नाकर

पिले खेकड्यांची, रेतीत पाडती
का ठसा आपला? पिले माणसांची,
मातीत गाडती का वसा आपला? न
संपेल साठा, केंव्हाच आपल्या
ह्या तलावातला अपेक्षेत
खोट्या, बेडूक फाडती का घसा
आपला? हमाली करोनी, वायाच
चालला जन्म माझा असा पिले
गाढवांची, ना सोडतीच का वारसा
आपला? जसे कवडसेही, ना भेटतीच
ते एकमेकां कधी तसे आज,
भावालाही न मानती फारसा आपला
धुवावेच ताटाला, स्वच्छ चेहरा
तो दिसे आपला पिले काळज्यांची,
ऊगाच व्यापती आरसा आपला
................... कसा भूत होताना
वर्तमान तो ढासळे आतला लढाया
भविष्याशी देह सांडती का असा
आपला? ** १) कल्पना, डॉ. बर्वे. हॅव
अ नाईस डे ५) कल्पना, डॉ.
पाब्रेकर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment