Saturday, March 20, 2010

कान फ़ळलेच नाही : गंगाधर मुटे

*कान फ़ळलेच नाही* उपदेशाने
कान कसे फ़ळलेच नाही माझे
बहिरेपण त्याला कळलेच नाही
निग्रहाचे धडे दिले विपरीत
दशेने पानगळीतही मग पान गळलेच
नाही. वेदनांचा काढा मग गटागटा
प्यालो तेंव्हापासून
व्यथांनी छळलेच नाही चिरंतन
असती बोल संत साहित्याचे
अनीतीच्या शेकोटीत जळलेच
नाही श्रावणात घननिळे जरा
पिघळले होते पुन्हा त्यांचे
थेंब कसे वळलेच नाही जनसेवेचा
प्रताप आणि "अभय" पुरेसे (?)
शुभ्रकापड घाणीतही मळलेच
नाही गंगाधर मुटे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment