Wednesday, March 17, 2010

देव नव्हता तरी... : अजय अनंत जोशी

देव नव्हता तरी भाकून गेले
स्वार्थ आपापले हाकून गेले
तोतयांची जशी बरसात झाली ...
शब्द माझे मला टाकून गेले
शिंकली ना तशी माशी कुठेही...
दैव कोठेतरी खाकून गेले आज
आपापले हिस्से मिळाले आज
संबंधही फाकून गेले काय देऊ
तुला दर्शन मनाचे ! तेज माझे
मला झाकून गेले जाणले आजही
त्यांचे इरादे जे नको तेवढे
वाकून गेले युद्ध खेळायचे
कोणाबरोबर ..? आपलेही उभे ठाकून
गेले..!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment