पायांना मी, कुठे जायचे कधीच
सांगत नाही तुडवत जातो रस्ते,
शोध तरीही संपत नाही... इतक्या
वर्षांनंतर तू मागतोस माफी
आता? जखमा भरती काळासोबत, ठणके
संपत नाही! तू आल्यावर, भिंती
फुलती, घर गंधांनी सजते तुझिया
अस्तित्त्वाची जादू मजला
उमगत नाही! स्वप्नांच्या त्या
गावी मजला फिरता यावे, म्हणुनि
मनातली मी कुठली अडगळ कधीच
फेकत नाही! प्रकाश नुस्ता...
प्रकाश... तुजला व्यक्त करावे
कैसे पाहत बसतो तुला एकटक...
कुणास सांगत नाही... - प्रणव
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2019
Tuesday, March 30, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment