Saturday, March 27, 2010

कशी अंकुरावीत आता बियाणे? : गंगाधर मुटे

*कशी अंकुरावीत आता बियाणे?*
भुईला दिली ओल नाही ढगाने कशी
अंकुरावीत आता बियाणे? दशा
लोंबतांना तिच्या
लक्तरांच्या कुणी का हसावे?
कुबेराप्रमाणे दगाबाज झाले
तुझे शब्द सारे अता हे फ़ुकाचे
कशाला बहाणे? निखारे विझूनी
कशी राख झाली? अता चेतवू मी
मशाली कशाने? तिजोरी कुणाची
उधळतो कुणी तो अमर्याद झाली
तयांची दुकाने गझल साथ देते न
हा देह मित्रा 'अभय' ते खरे जे
मिळविले श्रमाने गंगाधर मुटे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2008

No comments:

Post a Comment