Thursday, March 25, 2010

आपले म्हणून जा..कधीतरी : मानस६

ही गझल इतर संकेत-स्थळावर
प्रसिद्ध झालीय, त्यात काही
बदल करून इथे प्रकाशित केलीय.
एवढे करून जा..कधीतरी, ..आपले
म्हणून जा..कधीतरी विस्तवा,..
कळेल दाहणे तुला,
..वास्तवामधून जा.. कधीतरी कैक
जीव टांगणीस लागले, हे ऋणा,..
फिटून जा कधीतरी! आस्तिकास
सांत्वना मिळेल का?
ईश्वरा,..असून जा कधीतरी!
पांढरे कपाळ हाय स्फुंदते,
मांडवा, सजून जा कधीतरी!
स्वप्न सांगते " अरे,.. खरेच रे"
वास्तवा,.. भुलून जा कधीतरी काय
तीच मिळमिळीत भाषणे! ..वादळी
ठरून जा कधीतरी! वाहणे कितीक
काळ आणखी? सागरा,.. मिळून जा
कधीतरी पाहशील दिव्य
रत्न-माणके! खोल तू अजून जा
कधीतरी दार ठेंगणे
अश्यामुळेच की, मस्तका लवून जा
कधीतरी ऐकतेस का मुकाट नेहमी?
वादही करुन जा कधीतरी! चेहरे
खरे तुला बघायचे..? ..वेष पालटून
जा कधीतरी! -मानस६
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment