Saturday, March 27, 2010

इतके दव त्या रस्त्यावरती पडले होते... : ज्ञानेश.

========================== इतके दव त्या
रस्त्यावरती पडले होते...
नक्की तेथे रात्री कोणी रडले
होते ! * बर्‍याच वर्षानंतर
भेटुन जाणवले की बरेच काही
मधल्या काळी घडले होते ! तिला
मनाचे हिरमुसलेपण ऐकवले मी,
काही मिसरे फार तिला आवडले
होते ! एक उन्हाची तिरीप रस्ता
चुकली होती बाकी आयुष्यात
धुके बागडले होते.. काल
कचेरीवरती मोर्चा गेला होता
बहिर्‍याच्या कानात मुके
ओरडले होते ! त्या हातांची याद
अताशा रोजच येते ज्यांनी
जगण्यालाच कधी पाखडले होते
कागद दिसला, तत्परतेने उमटुन
गेले पेनामधले शब्द किती
अवघडले होते...! --ज्ञानेश.
=========================== (* मतल्याची
प्रेरणा- बशर नवाज साहेबांचा
हा शेर- "अब कोई दिल टूटा है
यकीनन फिर यहां, दूर तक
रस्तेपे शबनम है बहोत..!)
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2013

No comments:

Post a Comment