Tuesday, March 16, 2010

समर्थ : क्रान्ति

संहिता जुनी नवीन अर्थ मागते
अन्यथा विसर्जनास गर्त मागते
आज कोणत्या अटीत गुंतणार मी?
(भेट नेहमीच ती सशर्त मागते!)
कल्पनेस तेज, ओज, चेतना हवी,
ले़खणी सशक्त शब्द, अर्थ मागते
तोच घेउनी फिरे रिता कमंडलू,
काय त्या दयाघनास व्यर्थ
मागते? स्वत्व जागवील, राष्ट्र
उद्धरील जो, भूमि ही असा नवा
समर्थ मागते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment