Friday, March 26, 2010

जाऊ नको : आदित्यदेवधर

विझवून रात माझी, तू आज जाऊ नको
भरतीस लाट आजी, टाळून जाऊ नको
नुकतेच चंदनाने मी आज गंधाळले
नुसताच एकट्याने चंद्रात
न्हाऊ नको कसली शराब होती, तू
का मला पाजली? मजला नशेत धुंदी
होण्या सराऊ नको अजुनी न वेळ
गेली, ही रात ना आटली शपथा उगीच
काही तू आज खाऊ नको असले कसे
तुझे रे प्रेमास लाजावणे
निरपेक्ष जोगियाच्या गीतास
गाऊ नको जुळल्या तुझ्या नि
माझ्या गाठी मऊ रेशमी मग हा
'उशीर' वाला खोटाच बाऊ नको
तुजला कळे न माझे होणे
परीसापरी मधुस्पर्श मीलनाचा
सोडून जाऊ नको
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment