Friday, March 19, 2010

सल : अंतर्नाद - हर्षदा

खार्‍या पाण्याचा एक थेंब,
जातो फार काही सांगून.. उरात
ठुसठुसणार दुःख, फक्तं क्षणात
नेतो वाहून.. पापणीची ओलेती
कडा, सांगते आपली व्यथा..
पडद्याआड शिताफीने, लपवते
आयुष्याची कथा.. दाताखाली
दबलेले ओठ, शब्दांना ठेवतात
बांधून.. दुखाचा जळता निखारा,
हुंदक्यात टाकतात गिळून.. गरीब
बिचारे कान, झेलतात शल्याचे
तीक्ष्ण बाण.. घायाळ कानाच्या
आक्रंदाची, फक्तं हृदयाला जाण.
अंतरीचा रिकामी कोपरा, चुपचाप
पाहतो दुरून.. कोणा ना दिसणारी
सल, हळुवार ठेवतो जपून..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment