आकाशातुन तुटता तुटता तारा
मजला म्हटला आहे- 'अर्थ नसे
मरणाला आणिक अर्थ कुठे
जगण्याला आहे !' केव्हापासुन
काट्यांना तो विळखा घालुन
बसला आहे काळ असा
अजगराप्रमाणे निपचित निश्चल
पडला आहे.. भरपूर कल्पना वाहत
आल्या फुटलेल्या धरणामधुनी
पण प्रतिभेचा स्पर्श तयांना
अजून कोठे झाला आहे…
त्याच्यासाठी मी शब्दांचे
गंध घेउनी आलो सगळे... तर येथे
तो त्या शब्दांच्या मात्रा
मोजत बसला आहे! सावरणारा
पृथ्वीला अन् ब्रह्मांडाला
नाचवणारा- चैतन्याचा
आदिमबाबा बाळमुखातुन हसला
आहे! - प्रणव
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Saturday, March 27, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment