केवढे चालणे हे मजल दरमजल... काय
जाणे कुणी आखली ही सहल मी
कितीदातरी ओळ खोडायचो अन
तुझ्याहीमधे व्हायचे मग बदल
काय दुर्लक्ष हे पाहिल्या
पाहिल्या... का अशी घेत आहेस
माझी दखल? खूप थैमान मी घातले
याइथे सांगण्यासारखी एक नाही
गझल मानवी आज योनी ... उद्या
वेगळी ही रहस्ये उकल ती रहस्ये
उकल विश्व ओलावल्यासारखे
वाटते पापण्यांच्यामधे एक
पडदा तरल सागरासारखी लोचने
बोलली गाठ तळ, गाठ तळ, 'बेफिकिर'
आत चल
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Tuesday, March 23, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment