Sunday, March 28, 2010

पंढरी : मिल्या

वदंता वाटते आता.. कहाणी जी खरी
होती कधीकाळी इथे प्रत्येक
गावी पंढरी होती तुझ्या
माझ्यातले नाते जरासे वेगळे
होते जवळ होतो तरी.. दोघांमधे
कायम दरी होती तसा नव्हताच
रस्ता वाकडा अन खाच-खळग्यांचा
अरे पायातली चप्पल.. जराशी
चावरी होती तुझ्या श्वासातले
आव्हान इतके वादळी होते
किनारा सोडुनी नौका बुडाली
सागरी होती म्हणे येणार ती
झुळकेप्रमाणे ऐकले होते
उडाली उंच आभाळी.. मनाची शेवरी
होती कुणी यावे कुणी जावे,
कुणी मुक्काम ठोकावा हृदय का
धर्मशाळेतील पडकी ओसरी होती?
तुला सांगूनही कळलाच नाही
अर्थ मौनाचा तुला तर वाटले
केली तुझी मी मस्करी होती तुला
भेटायला येईन का मी रिक्त
हातांनी? तुझ्यासाठीच मॄत्यो
आणली मी भाकरी होती
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment