Tuesday, March 23, 2010

दुःखाचा ठिपका : प्रणव.प्रि.प्र

दुःखाचा ठिपका पसरत जातो आहे
टिपकागद माझा संपत जातो आहे!
शहरात भयंकर वाढत आहे गर्दी
एकटेपणा भांबावत जातो आहे... तू
गेल्यावरती उरते मागे काही...
मौनाने मी ते चुंबत जातो आहे!
सारखा पाहुनी गर्भपात
स्वप्नांचा डोळ्यांचा धीरहि
संपत जातो आहे.. ''भरकटणेसुद्धा
शोधच असतो, वेड्या'' मी मनास हे
समजावत जातो आहे सिग्रेट
संपते... उरतो धूर क्षणांचा मी
फिल्टरसुद्धा ओढत जातो आहे! -
प्रणव
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2000

No comments:

Post a Comment