************************ ************************ पुन्हा
सत्य स्वप्नांस तुडवून गेले
जगण्या मला बाध्य करवून गेले
काळजास देतो भरोसा तरीही
असो..व्ह्यायचे तेच होऊन गेले
कशाला धरावा जगाशी अबोला तिचे
ओठ जर नियम टाळून गेले जिथे
यायची ती कधी भर दुपारी तिथे
आज अंधार बिलगून गेले झगे
सात्विकांचे, मलमली बिछाने
कसे पाप पुण्ण्यांत मिसळून
गेले तु माझा विसावा तुच वसंत
आहे ऋतुंना किती कोण फसवून
गेले मलाही कळेना जगावे कशाशी
दिलासे कधीचेच सोडून गेले
करावी न तक्रार 'मैत्रेय' आता
तसे लाड सारेच पुरवून गेले
************************* *************************
www.maitreyaa.wordpress.com
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2002
Thursday, March 25, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment