शब्दांमधुनी जगण्याशी मी
भांडत जाता कोंडा उरतो
जगण्याला या कांडत जाता थोर
जनांचे जीवन तुम्हा कधी न कळले
फोटोंमधुनी नुस्ती तत्त्वे
टांगत जाता पंख गळोनी धरतीवर
मी पडेन तेव्हा फक्त थांब तू,
जन हे सगळे पांगत जाता पूर
होउनी कशा माती वाहुन न्यावी?
झिरपत जावे थेंब थेंब अन्
सांडत जाता चाकोरीत
कुणाच्याही ते बसले नाही जगणे
म्हणजे अमुक तमुक का सांगत
जाता व्याख्या कुठली कवितेची
हो, कशास करता कविता दिसते बाळ
कोवळे रांगत जाता - प्रणव
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1985
Friday, March 19, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment