मोजकी उन्हे , मोजक्या सरी ,
मोजकेच वारे होते शेवटी किती
मोजले तरी मोजकेच सारे होते
पाहिले तिने , गूढ हासली , मान
डोलली थोडीशी हे जुनेच होते
नकार की हे नवे इशारे होते
कालही तुझ्या बरसण्यामधे
आलबेल नव्हते सारे कालही
तुझ्या पावसातले दोन थेंब
खारे होते मस्तकी टिळा लावला
कुणी , हात जोडले काहींनी छान
वागले भक्तगण तुझे .. छान
हातवारे होते पण तुझ्या नभी
नेहमी सखे पौर्णिमाच नांदत
होती मी खिशामधे ठेवले तसे दोन
चार तारे होते घट्ट बंद कर ओठ
आपले , लाव शांततेची पट्टी
ह्या जगी कुणी शब्द काढला की
अरेस का रे होते वारला म्हणे
गुदमरून तो श्वास रोखलेला
पक्षी आठवांवरी, आसवांवरी
रात्रभर पहारे होते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, March 25, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment