Wednesday, March 31, 2010

सध्या! : मधुघट

प्रश्न जगाला, काय काय मी करतो
सध्या... पतंगापरी हवेत मीही
उडतो सध्या! जन म्हणती हे'
"शिंगे फुटली तुजला बेट्या"..
आरशातही पाहण्यास मी डरतो
सध्या! दुकानांवरी पुन्हा
मराठी दिसती पाट्या मराठीसही
'भाव' पुरेसा मिळतो सध्या!
फूलपाखरी जिणे जाहले
नकोनकोसे सुगंधातही जीव किती
घुसमटतो सध्या..! तुझ्या
आठवांचे कोळिष्टक अवतीभवती..
सुटू पाहतो तसा त्यात गुरफटतो
सध्या! मोठे मिळता अंथरूण,
पसरेल पाय तो पथारीवरी छोट्या
जे आक्रसतो सध्या! बरसायाला
हवी तशी जागाच मिळेना.. भरून
येतो..पुन्हा पुन्हा ओसरतो
सध्या! अर्ध्या हळकुंडाने
तेव्हा पिवळा झालो.. आशयघन
शब्दांना शोधत फिरतो सध्या!
मानेवरती पेलुनिया जू
भवितव्याचे आयुष्याची जमीन
नांगरतो सध्या!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment