वचन तुला दिलेले अजुन पाळतो मी
गजरा शब्दसुमनांचा तुला
माळतो मी. वाहती मनात माझ्या
प्रीतीनिर्झरे लाखोवरी सागर
तव प्रीतीचा ,तरी टाळतो मी.
येणार ना परत कधी क्षण ते रम्य
गुलाबी पिंपळ पाने आठवणींचे
उगा चाळतो मी. उलटले पर्व सखे
पाहून मुखकमल तुझे तव
प्रतिमेस मनातल्या तरी भाळतो
मी. बरसशील कधीतरी तू हा
प्रेम-अग्नी विझवायला तव
प्रीती थेंबासाठी मनाला अजून
जाळतो मी. नसलीस समोर तू
म्हणून काय झाले आभास गोड तुझा
हृदयी परीमाळतो मी.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1996
Tuesday, March 23, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment