श्री. वैभव जोशी यांच्या
नुकत्याच प्रकाशित झालेल्या,
मोजक्या सरी मोजकी उन्हे, या
रचनेवरील प्रतिसादांपैकी
माझ्या प्रतिसादातील एक
विधान व त्यावर मानस ६ यांनी
'यावर विस्तृत चर्चा व्हायला
हवी' असे काढलेले उद्गार
यामुळे मला हा चर्चा प्रस्ताव
मांडावासा वाटला. एखादी गझल
तंत्रातील व समभाषिक
सज्ञानाला सहज समजू शकणारी
रचना आशयाच्या दृष्टीने गझल
म्हंटली जावी की नाही यावर
'स्पेसिफिक' लेखन उपलब्ध नसावे
असे वाटते. तसेच, हा कलाप्रकार
असल्याने कोणाचेच म्हणणे
अंतीम ठरणार नाही त्यामुळे
मतमतांतरे होणार व दोन अधिक
दोन म्हणजे चार असे सूत्र
मांडता येणार नाही याचीही
जाणीव आहे. जुन्या जमान्यातील
व सध्याच्या श्रेष्ठ कवी व
समीक्षकांच्या मार्मिक
टिपण्ण्यांपैकी या विषयावर
एखादे औपचारिक लिखाण केलेले
असावे असे वाटत नाही. मी
स्वतःच्या नावाने केलेल्या
(भूषण / बेफिकीर) आंतरजालीय
लिखाणापैकी जे लिखाण
'दुसर्याच्या कलाकृतीवर
दिलेला प्रतिसाद ' आहे त्यात
एक ते दोन टक्के लिखाण सोडले
तर बाकी लिखाण कोणताही
व्यक्तीगत अजेंडा मनात ठेवून
केलेले नाही. जे तसे केले आहे
तेही मी माणूसच आहे
म्हंटल्यावर झाले आहे. हे इथे
मधेच सांगण्याचे कारण असे की
एखाद्याच्या गझलतंत्रातील
रचनेला सर्वांसमक्ष कविता
म्हणण्यात मला मूळ कवीच्या
नावामुळे काळजी किंवा भीती
वाटत नाही व सूड घेतल्याचे
समाधानही मिळत नाही. माझ्या
मनात जे विचार आपोआप येतात ते
'अनफिल्टर्ड' पद्धतीने
मांडण्याचा माझा विचार असतो.
गझल की कविता या विषयावर
आपल्या सर्वांच्या मतांचा
पुर्ण आदर आहे. पण प्रस्ताव मी
मांडल्यामुळे मला स्वतःचे मत
आधी लिहायला हवे. ते
खालीलप्रमाणे: गझलेचा आशय कसा
असावा यावर ही चर्चा
नसल्यामुळे 'गझलेचा आशय हा
जीवनानुभुतीवर आहे' असे गृहीत
धरत आहे. आशय गझलेत
मांडण्याच्या पद्धतीमुळे
रसिकाला खालीलपैकी एक गोष्ट
अनुभवायला मिळावी असे माझे मत
आहे. १. "ओह... असे म्हणायचे होते
होय याला?"
(अनप्रेडिक्टॅबिलिटी) २.
अतिशयोक्तीमुळे 'निखळ' हसू
येणे ३. प्रस्थापित
संस्कृतीवरील मिश्कील व सभ्य
भाषेत मार्मिक ताशेरे मारले
गेल्याचा आनंद घेता येणे ४.
विरोधाभासामुळे हसू येणे ५.
दु:खी होणे यापैकी 'हसू येणे'
यात शेर विनोदी असावा असे मला
अभिप्रेत आहे असे कृपया समजले
जाऊ नये. अशा शेरांचे सहज
आठवणारे उदाहरण म्हणून एक
उर्दू शेर देत आहे. बहुधा
मोमीनचा असावा. मै भी कुछ खुष
नही वफा करके तुमने अच्छा किया
निबाह न की आता ती जर वफादार
असती तर हा वफा करून खुष झालाच
असता ना? पण हा जणू
त्रयस्थाप्रमाणे तिला असे
सांगतोय की तू वफादार नव्हतीस
ते बरे झाले, मी पण वफा करून
शेवटी विरहात जळतोच आहे. जणू
तिचे प्रेम इतर कुणावर तरी
होते अन याचे तिसर्याच
कुणावर तरी! या व्यतिरिक्त
असलेल्या पद्धतींनी माडलेला
आशय हा (मल स्वतःला) कवितेचा
वाटतो. याचे कारण तो सरळ
सांगीतला जातो. त्यात उत्तम
शब्दरचना, प्रतिमा, लहजा, सरळ
साध्या बोलल्यासारख्या ओळी,
प्रवाहीपणा, रदीफ / काफियांचे
नावीन्य यातील व याशिवाय इतर
काहीही उत्तम असू शकते. पण आशय
व आशय मांडण्याची पद्धत जर
मेंदूला पीळ पाडणारी नसेल तर
मला ती कविता वाटते. आपली मते
देण्यामुळे एक बर्यापैकी
चर्चा होईल असे वाटते. माझ्या
मतांमधून मला कुणालाही
दुखवायचे नाही. तसे कुणी
दुखवले गेल्यास क्षमस्व! मला
स्वतःला तरी या चर्चेचा
निश्चीत फायदा होईल असे मला
वाटते. धन्यवाद! -'बेफिकीर'!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Monday, March 29, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment