Tuesday, March 16, 2010

पालखी : चक्रपाणि

'अनिवासी (पण) भारतीय' म्हणुनी
दुखर्‍या किती ओळखी डॉलरने
भरले खिसे पण मने प्रेमास का
पारखी? आहे जे विसरायचे ठरवले,
करतो उजळणी जरा (विस्मरणे
नव्हती कधीच कुठली सोपी,
मनासारखी) आषाढा, बघतोस काय
नुसते! भिजवायचे मग कुणी? 'आधी
तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली
ना सखी! दुर्दैवा, इतके नकोस
विसरू बाबा स्वत:ला कधी! माझे
नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी
आणखी? आयुष्या, जगलो, तुला
भोगले - ऐटीत, राजापरी तिरडीवर
निजलो तरी मिरवले - निघते जशी
पालखी *पूर्वप्रसिद्धी:* मनोगत
दिवाळी अंक २००८.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1980

No comments:

Post a Comment