Friday, March 12, 2010

बोलणे माझे ... : अजय अनंत जोशी

बोलणे माझे निखार्‍यातून आहे
सावली तितकीच हृदयातून आहे
भाग्य मिळवायास आहे फार सोपे
फक्त तिथला मार्ग काट्यातून
आहे घेतली आहे कुठे मी
आजसुद्धा..? ही नशा माझ्याच
जगण्यातून आहे भेट होते रोजची
, पण प्रश्न उरतो... आजही संवाद
दारातून आहे भय कुणाला वाटले
इतके कधी ? जे - आपल्या एकत्र
येण्यातून आहे.... भांडणे, एकत्र
येणे रोज होते गाठ मैत्रीचीच
अफलातून आहे शेर कुठला मी कधी
रचलाच नव्हता भाव आला फक्त....
जो आतून आहे आपलेपण "आपला"
म्हणण्यात नाही... नेहमी
म्हणता किती...? यातून आहे **
मतल्यासाठी काफियात छोटी सूट
घेतली आहे.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment