Monday, March 15, 2010

रिताच पेला : अभिषेक दीपक कासोदे

पाऊस वादळाचा सारे कुटून गेला,
भा॑बावल्या जिवाला वारा
लुटून गेला !.....१ हाती अखेर
माझ्या आला रिताच पेला खोटेच
झि॑गताना तोही फुटून गेला
!.......२ सोडून मोह सारे, केली
तुझीच इच्छा तेव्हाच नेमकासा
तारा तुटून गेला !........३ त्या
मैफिलीत, साधा ऐकून शेर माझा
शेजारचा कवी का रागे उठून गेला
?......४ कारागॄहात, आम्ही एकाच
सर्व होतो झेलून थू॑क
'त्या॑ची', जो तो सुटून गेला !..५
आजन्म ना कळाले, देहात जीव
माझ्या केव्हा कुठून आला ?
केव्हा कुठून गेला ?..६
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1974

No comments:

Post a Comment