Tuesday, March 2, 2010

खुशाली : आनंदयात्री

खुले चेहरा अन् खुळी लाज गाली
समजली जगाला गुलाबी खुशाली
जसे वेगळे भास नजरेतले अन् तशा
वेगळ्या आतल्या हालचाली विडा
रंगुनी जायचा रात्र सरता नभी
उमटुनी जायची शुद्ध लाली
पुन्हा लागला एक चकवाच बहुधा
खरी वेगळी वाट केव्हाच झाली
तुझ्या आसवांचे निराळेच दावे
तुझे वागणे काढती ते निकाली
अभागी सुखाचा तुझ्या बोलबाला
मुके दु:ख माझे तसे भाग्यशाली
समजलेच नाही कधी ठार झालो
पहार्‍यास होते सगे भोवताली
पुरे जीवना, मात दे एकदाची कशा
परतवू या तुझ्या गूढ चाली? जरी
खोल असती ठसे पावलांचे तरी वाट
नसते कुणाच्या हवाली - नचिकेत
जोशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1945

No comments:

Post a Comment