Monday, March 15, 2010

ऋतुंची ऐकली कुजबूज मी : बेफिकीर

ऋतुंची ऐकली कुजबूज मी...
लावण्य आल्यावर मला कळवायचे
नाहीस का तारुण्य आल्यावर?
जगामध्ये मला धाडायचे होतेस
देवा तू...... हवा तो चेहरा
धारायचे नैपुण्य आल्यावर
सुखे येतात कुठलाही इतर
पर्याय नसला की उजवती लेक
कोठेही जशी वैगुण्य आल्यावर
अता वाल्मीकि वाल्या जाहला,.....
हसली मुले बाळे कुणी वाटेकरी
नव्हता नशीबी पुण्य आल्यावर
नको पाहूस नवलाने, तुझी काही
चुकी नाही सरावाने उजळतो मी
अता कारुण्य आल्यावर टीप -
मतल्यात अलामत सूट
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1971

No comments:

Post a Comment