मागे एका गझलेतिल प्रतिसादात
चित्तरंजन भट म्हणाल्याचे
स्मरते की व्यक्तिसापेक्ष
रचलेला शेर अथवा गझल ही काळ
पालटल्यानंतर अथवा तो प्रसंग
विस्म्रुतीत गेल्यावर
अपेक्षित परिणाम येत
नाही......परंतु कालच वाचनात
शिवाजि जवरे यांची ही गझल
आली.....२००४ मध्ये रचलेली ही
गझल.....आजही हातोडा आहे.....
कुणाच्या 'बा'सही नाही कळे-१२
मतिवाला पडे-लोळे तरीही ना
मळे-१२ मतीवाला. कसाही वाजवी
पावा कधी उजवा कधी डावा जिथे
लोणि दिसे तेथे वळे-१२ मतीवाला
तसा हा लाल किल्ल्याच्या
उभ्या दारात ना मावे प्रसंगी
चाळणीतुनही गळे-१२ मतीवाला
उभ्या ओसाड या रानी बघा तो
दावतो पाणी म्हणे खोट्या
तरंगांना-तळे-१२ मतीवाला
उसाला नी कपाशीला किती मी घाम
शिंपावा? करे मिर्ची न
खुर्चीचे खळे १२-मतीवाला
सकाळी फेकुनी देतो दुपारी
वेचुनी घेतो पुन्हा रात्री
वडे त्याचे तळे-१२ मतीवाला
कधीचे बांधुनी आहे बघा बाशिंग
गुडघ्याला- कधी भरती म्हणे
घटका-पळे-१२ मतीवाला कधीचे
लोटतो आम्ही-बघा दिल्लीकडे
याला फिरुनी हा इथे वाळू
दळे-१२ मतीवाला विदेशिचा नको
गुत्ता म्हणे मी काटला पत्ता-
पुन्हा का त्याच वाटेने पळे-१२
मतीवाला? --शिवाजि जवरे...."आवेग "
गझल संग्रह्,किर्ति
प्रकाशन्,औरंगाबाद-२००४
कैलास गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1960
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment