अजून मेघांत वीज जेव्हा
थरारताहे तुझ्या स्मृतीने
तसाच मीही शहारताहे! जरी
तुझ्यावाचुनी फुले ही मलूल
झाली, तुझ्या स्मृतीने अजूनही
मी तरारताहे! अता तमाचे उगाच
कारण नकोस सांगू पहा पुन्हा हे
नभांग सारे उजाडताहे! असाच
जातो जिथे दिसा नेतसे तिथे मी,
अजून दैवावरी तरी मी
विसावताहे! गुमान जो तो जुनाट
वाटांवरून गेला खुळाच तो जो
इथे नवी वाट काढताहे! कुणी
म्हणे हा कवी अताशा लिहीत नाही
कुणास सांगू मनातले जे
निखारताहे!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, March 11, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment