*दाव तोच जीवना लावतो पुन्हा
पुन्हा मृत्युला जगायला
शिकवतो पुन्हा पुन्हा चांदणी
कधी कुण्या अंबरास भार ना
चंद्र मग उगाच का हरवतो पुन्हा
पुन्हा आसवे न ढाळली मी कधीच
पांगळी का तिच्यापुढेच मी
भेकतो पुन्हा पुन्हा माज ही
जुनाच शिरजोर आज ती पुन्हा आग
तीच मी परी पोळतो पुन्हा
पुन्हा हां...कबूल दुश्मनी
जन्मजात लाभली बांध घालुनी
दुवा सांधतो पुन्हा पुन्हा
हात जोडुनी उभे सौख्य मजपुढे
सदा व्यर्थ दशदिशात मी शोधतो
पुन्हा पुन्हा जयश्री *
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1964
Wednesday, March 10, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment