Monday, March 8, 2010

भेटत राहू : केदार पाटणकर

वसंत येवो, येवो श्रावण..भेटत
राहू मनातले सांगण्यास आपण
भेटत राहू थोडा थोडा
दोघांनाही उशीर होतो
परस्परांना देण्या कारण भेटत
राहू ठिकाण बदलू, वेळा बदलू,
मुद्दे बदलू करु बदल पाहिजे
तसा पण भेटत राहू भेटायाचे हेच
खरे तर वय आहे ना? घालवू नको
सोनेरी क्षण..भेटत राहू
बोलायाला हवेच काही, असे न आहे
कधी सकारण, कधी अकारण भेटत
राहू
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1957

No comments:

Post a Comment