मी कधीही पेटलेली आग नव्हतो मी
कधीही बहरलेली बाग नव्हतो भूक
होती, झोप होती, श्वास होते मीच
देहाचा कधीही भाग नव्हतो कोण
होतो ते मला कळलेच नाही कमळ
नव्हतो, फणस नव्हतो, साग
नव्हतो माळरानी छेडलेली शीळ
होतो मैफलीमधला कधी मी राग
नव्हतो लागला माझा कसा तुजला
सुगावा? ठेवुनी जावा असा मी
माग नव्हतो नचिकेत जोशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Wednesday, May 26, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment