Monday, May 24, 2010

निखारे : योगेश्वर रच्चा

नालायकांस कोणी द्यावे किती
इशारे उडवून झोप त्यांची जाती
पहाटवारे! छिद्रामुळे बुडाली
त्यांची अजस्र नौका आता
तरींमधूनी ते शोधती किनारे!
मैत्रीस जागुनी मी त्यांच्या
मिठीत गेलो पाठीमधेच त्यांनी
सरकाविली कट्यारे
खुर्चीतुनीच आज्ञा देती
भिकार राजे होते न जे कधीही
युद्धात झुंजणारे! उरले उरी न
आता आवाज चांदण्यांचे आता
कवेत माझ्या ते सूर्य चंद्र
तारे! ओकून आग मीही शमलो जरा
तरीही अद्यापही न विझले
हृदयातले निखारे - योगेश्वर
रच्चा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2098

No comments:

Post a Comment