Sunday, May 30, 2010

... वंशातल्यांचे : अजय अनंत जोशी

मी पुरावे शोधले
त्यांच्यातल्यांचे अन्
दुरावे रोखले माझ्यातल्यांचे
चालली कसरत अशी अर्थासभोती
नाच नंगे खेळती
शब्दातल्यांचे एकही शत्रूस
नाही सोडले मी काय मग होईल या
हृदयातल्यांचे ? येर बसती
सज्जनांच्या पंगतीला बेत
काहीसे फसावे आतल्यांचे सत्य
कोठे माहिती आहे कुणाला ? नाव
होते आजही पेल्यातल्यांचे
सोडती घरटे... तरी सोडा म्हणावे
मन कधी मोडू नये
डोळ्यातल्यांचे नाव माझे 'अजय'
मीही सार्थ केले पण, जगाला
पाहिजे वंशातल्यांचे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment