मजनू-लैला,हिर-रांझा,काफिया-रदिफ
असे जुळ्याचे दुखणे म्हणजे
काफिया-रदिफ! तिच्या मागुनी
मुकाट चालत जाइन कैसा वाटलो की
काय तिला मी काफिया-रदिफ?
म्हटले मित्रा,कुठवर आली
प्रेम कहाणी? म्हटला तो,छे!ते
तर नुसते काफिया-रदिफ! लिहू
लागली गझल जशी ती अता-अताशा
कळू लागलो तिला जसा
मी,काफिया-रदिफ हळहळतील
चितेला बघुनी,म्हणतिल सारे
निमूट जळला जसा बिचारा
काफिया-रदिफ! बोललीच ती
मैत्रिणींमधे माझ्या बद्दल
तो गं म्हटली,रटाळवाणा
काफिया-रदिफ! बहूमतांचा खेळ
तयांचा सुरू जाहला माणूस झाला
मात्रा अथवा,काफिया-रदिफ!
स्वभावातले अंतर थोडे जुळवून
घेऊ जुळवून घेतो मतला
जैसे,काफिया-रदिफ!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2084
Thursday, May 20, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment