Sunday, May 23, 2010

दुःखे : योगेश्वर रच्चा

का निरागस सोबत्यांना मी दिली
दुःखे? जन्मभर एका चुकीतुन
भोगली दुःखे दुःख विसराया जरी
मी प्यायलो थोडा... प्यायला
माझ्याच संगे बैसली दुःखे मज
सुना एकांत माझा आज आवडला जी
तुझ्या संगाहुनी मज भावली
दुःखे जो कधी जगती सुखांच्या
जीव हा रमला आठवण माझीच काढू
लागली दुःखे हा वसंताचा बहर
आला मनी माझ्या भाबड्या हृदयी
तरीही स्पंदली दुःखे
मृत्युशय्येतून मी तुजला
दिल्या हाका शेवटी
आप्तांप्रमाणे वागली दुःखे -
योगेश्वर रच्चा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment