Saturday, May 22, 2010

तुकारामा.. : रुपेश देशमुख

किती आले किती गेले महाज्ञानी
तुकारामा.. कुणीही पोचला नाही
तुझ्या स्थानी तुकारामा.. जरी
हे लाभले आम्हा विचारांचे
करंटेपण.. करी श्रीमंत
जगण्याला तुझी वाणी तुकारामा..
फुकाचा गर्व थोडाही तुला का
स्पर्शला नाही... शहाणे थोर
आताचे किती मानी तुकारामा..
दिले तू दान अर्थाचे , खरोखर
धन्य ते झाले.. किती केलीस
शब्दांवर मेहरबानी तुकारामा..
अनंते ठेवले जैसे, तसा तू
राहिला होता.. कसे केलेस
जन्माला समाधानी तुकारामा..
प्रा. रुपेश देशमुख.
९९२३०७५७४३.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2095

No comments:

Post a Comment