Friday, May 21, 2010

'चुकलो' म्हणेन मी तर सोकावतील सारे : चक्रपाणि

'चुकलो' म्हणेन मी तर सोकावतील
सारे शिक्षाच शेकडोंनी
ठोठावतील सारे उल्लेख आपले तू
वेळीच टाळ आता येताच नाव माझे
भंडावतील सारे आडून ओढणीच्या
उगवेल चंद्र माझा
डोळ्यांमधून तारे डोकावतील
सारे डोक्यात आग जेव्हा पेटेल
भाकरीची करतील
ज़ाळपोळी,थंडावतील सारे सोडून
साथ माझी गेली दलाल दु:खे
बाज़ार वेदनांचे मंदावतील
सारे (पूर्वप्रसिद्धी: मनोगत
दिवाळी अंक २००७)
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment