ऐकत नाही आता हे मन रात्रंदिन
केवळ आक्रंदन कधीतरी मग संयम
सुटतो अवेळीच होते उद्दीपन
भूक लागते शरीरास, मग कसली
सीमा? कसले बंधन? झाले बघ
दोघेही मोठे परस्परांचे
करुनी खंडन! सूट बूट अन टाय
गळ्याला तोंडावर कृत्रिम
अभिवादन जिकडेतिकडे मोठ्या
वेण्या स्वस्त जाहले का
गंगावन? आधी घालू शिव्या जगाला
नंतर करणे आहे वंदन ह्यास
म्हणावे खरी संस्कृती सुगंध
देतच झिजते चंदन टाळ मला, पण
जाणुन घे तू माझे तुजवरचे
अवलंबन तुला पाहताक्षणीच
झाली माझी अवघी दृष्टी पावन
मधुघट कोठे ठरवू शकतो.. व्हावे
कोणा कसे आकलन!!! - अमोघ
प्रभुदेसाई 'मधुघट'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, May 27, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment