गाठायचे असते स्वतःला..... गाठले
की जाहले अगदीच नाही सोसले तर...
थांबले की जाहले तू ये, नको
येऊस तू..... मी आपला असतो इथे
कोणीतरी ठरल्याप्रमाणे वागले
की जाहले सध्या कशी आहेस तू ही
काळजी नाही मला तेव्हा कशी
होतीस तू हे चाळले की जाहले
दारूत पाणी घालण्याची सोय
नाही राहिली पाणी हवे होते
जरासे... वाटले की जाहले
मृद्गंध आला, नाहिली असणार
बहुधा आज ती डोके गरम... ओले
जरासे जाहले... की जाहले नाकी नऊ
येतात तेव्हा वाटते की.....
जाउदे तालाप्रमाणे या
जगाच्या नाचले की जाहले
बांधून झाला पूल! का जाईचना
वरुनी कुणी? खालून जाणे बंद
करणे साधले.... की जाहले
कोणाप्रमाणे व्हायची इच्छा
कशाला पाहिजे? 'माझ्याप्रमाणे
मीच आहे' वाटले की जाहले तू
नेसली नाहीस ती साडी गुलाबी...
त्यापुढे तू ते बरे केलेस हे
मी गिरवले की जाहले बाकी तसा
कैदेत काही त्रास नसतो
'बेफिकिर' जितके दिवस असतात
तितके काढले की जाहले
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2123
Monday, May 31, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment