................................................. ...जायला
हवे ! ................................................. मन
विसकटून, चुरगळून जायला हवे !
जगणे जरा तरी मळून जायला हवे !
हे दोन-चार कोरडे तरंग तेच ते ...
सारे तळेच खळबळून जायला हवे !
नक्की कधीतरी जमेल...आज ना
उद्या... फुलल्याविनाच दरवळून
जायला हवे ! माझे तुझ्याविना न
पान हालते जरी... मी एकटेच
सळसळून जायला हवे ! हे रोजचे
जिणे नव्हे जिणे; तुरुंग हा...
आता इथून मज पळून जायला हवे !
ताटातुटीत ज्यास हे जमेल तो
खरा...! मागे न पाहता वळून जायला
हवे ! येते कधी तरी अजूनही
तरंगुनी... माझ्यात दुःख
विरघळून जायला हवे !! हा देह
पापशून्य व्हायचा कधी ? कसा?
आता किती, कसे जळून जायला हवे ?
मी-तू किती उजेड पाडला तसा इथे ?
आता मला-तुला ढळून जायला हवे ! -
प्रदीप कुलकर्णी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2076
Friday, May 14, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment